अमळनेर येथे उपोषणकर्त्यांची भव्य मिरवणुक व सत्कार समारंभ संपन्न..
अमळनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील आदिवासी कोळी समाज मंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ दिवसांचे अन्नत्याग सत्याग्रह करणारे उपोषणकर्ते जगन्नाथ बाविस्कर (चोपडा), संजय कांडेलकर, नितीन कांडेलकर (मुक्ताईनगर), पुंडलिक सोनवणे (भोकर), पद्माकर कोळी (डोंगरकठोरा), नितीन सपकाळे (अंजाळे), सुनीता तायडे (रावेर), पुष्पा कोळी (बुलढाणा), भगवान कोळी (चुंचाळे) यांची संतश्रेष्ठ श्री सखाराम महाराज मंदिर (वाडीचौक) पासून रूबजीनगर (कोळीवाडा) पर्यंत सवाद्य भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी येथील महिलांनी उपोषणकर्त्यांचे औक्षणही केले.
प्रारंभी रूबजीनगर येथे आयोजित स्वागत समारंभात मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.चे माजी.सदस्य प्रभाकर सोनवणे(मोहाडी) यांचा सत्कार रामचंद्र सपकाळेसर यांनी केला. मंडळातर्फे उपोषणकर्त्ये व समन्वय समिती सदस्यांचा शाल हार श्रीफळ व म.वाल्मिकींची मुर्ती देऊन यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ज्येष्ठ समाजसेवक गुरु मधुकर कोळी यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांची समायोचित भाषणेही झालीत. व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक प्रल्हाद बाविस्कर,लक्ष्मीबाई बाविस्कर (माजी नगरसेविका अमळनेर), प्रमिलाबाई सोनवणे,(माजी नगरसेविका अमळनेर), लखिचंद बाविस्कर, समन्वय समितीचे प्रमुख जितेंद्र सपकाळे, प्रल्हाद सोनवणे, खेमचंद कोळी,गोपाल कोळी,विशाल सपकाळे, संदीप कोळी, समाजसेविका सौ. मंगलाताई सोनवणे यांचेसह श्रीमती.जावित्रीबाई बाविस्कर, सौ.आशाबाई बाविस्कर, भाईदास कोळी, नामदेवराव येळवे, दौलत कोळी, वैभवराज बाविस्कर,लिलाधर ठाकरे, भाऊसाहेब सोनवणे, दिनकर सपकाळे,रणजीत सोनवणे, बापु कोळी, किशोर कोळी, भाऊलाल महाराज यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी तालुका व जिल्हाभरातील शेकडों कोळी समाजबांधवांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोळी समाज मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचलन युवा प्रेरक सागर सुकदेव कोळी तर आभार प्रदर्शन गुरु मधुकर सोनवणे यांनी केले. शेवटी उपस्थितांसाठी महाप्रसाद भोजन भंडाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली होती.