भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केली कॅफेची तोडफोड, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का..
चाळीसगाव प्रतिनिधी | तरुण व तरुणींना अनैतिक कृत्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या एका कॅफे वर पोलिसांसह छापेमारी करत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी या कॅफे ची तोड फोड केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका अनाधिकृत कॅफेमध्ये तरुण तरुणींना अनैतिक कृत्य करण्यासाठी कॅफे मालकाकडून जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती पोलिसांसह आमदर मंगेश चव्हाण यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे आज पोलिसांच्या पथकासह आमदार मंगेश चव्हाण यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, अंधारात काही तरुण-तरुणी आढळून आल्याचं दिसून आले. या घटने नंतर संतप्त झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांनी या कॅफे ची स्वतःच तोडफोड केल्याने खळबळ उडाली आहे. चाळीसगांव शहराचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या कॅफेबाबत मागील वर्षी देखील आपण कॅफे चालकाला समज दिली होती, त्या नंतर काही काळासाठी या ठिकाणी सुरू असलेला हा प्रकार बंद देखील झाला होता.
मात्र गेल्या काही दिवस पासून या क्याफेमध्ये पुन्हा अनैतिक प्रकार सुरू झाल्याचे माहीत सामोर आल्याने नपा प्रशासन,पोलिस प्रशासन आणि आपण या ठिकाणी आलो असता या ठिकाणी गैरकृत्य करताना तरुण-तरुणी आढळून आले आहेत. अशा प्रकारची गैरकृत्य कोणी करत असेल आणि त्याला कोणी जागा उपलब्ध करून देणार असेल तर ते कदापिही खपून घेतले जाणार नाही वेळ पडली तर अशा इमारतीवर बुलडोझर देखील फिरविला जाईल असा इशारा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. या कॅफे चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांची चौकशी केली जात आहे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.