जळगाव

वरूनदेवता च्या आगमनाने संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रेचे जळगाव जिल्ह्यात जल्लोषात स्वागत.. 

जळगाव – नोव्हेंबर रोजी भागवत धर्माचे ज्येष्ठ प्रचारक,राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२७ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५४ व्या जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान साहेब(पंजाब) अशा सुमारे २,१०० किलोमीटरच्या रथ व सायकल यात्रेचे सोमवारी विठ्ठल नामाच्या व श्री गुरुनानक देव जयघोषात जळगांव जिल्ह्यात पहूर पाळधी सकाळी ९ वाजता येथे मोठ्या उत्साहात पुष्प वृष्टी करून स्वागत करण्यात आले .

भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ आणि श्री नामदेव दरबार कमिटी घुमान ( पंजाब ) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत नामदेव महाराज यांची श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान अशी रथ व सायकल यात्रा काढण्यात आली असून शांती, समता, बंधुता या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी या यात्रेत सर्व वयोगटातील सुमारे शंभर सायकलयात्री सहभागी झाले आहेत .या यात्रेने २३ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथून प्रस्थान ठेवले .

आज या यात्रेचे वरून देवाच्या आगमनाने पाळधी ता जामनेर येथे मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात आगमन झाले .जळगांव जिल्हा हितवर्धकसंस्था, शिंपी समाज पाळधी ग्रामपंचायत , पत्रकार संघटनेच्या वतीने स्वागत प्रभाकर शिंपी रवींद्र लोहार अ भा क्ष नामदेव महासंघ महाराष्ट्र राज्य संघटक मनोज भांडारकर. पी टी शिंपी विवेक जगताप पाळधी चे उपसरपंच कमलाकर पाटील व छोटू कापुरे अनिल खैरनार दिलीप सोनवणे यासह असंख्य समाज बांधवांनी रथ व सायकल यात्रेचे स्वागत केले .त्यांच्या हस्ते पादुकांची पूजा रवींद्र लोहार छोटू कापूरे यानी सपत्नीक पुजा केली सायकल यात्रीना चहा नाष्टा रवींद्र लोहार याच्या कडून देण्यात आला तसेच सर्व वारकरीना पाळधी समाजातर्फे रूमाल टोपी पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे , उपाध्यक्ष शंकर टेमघरे , सचिव ॲड विलास काटे , खजिनदार मनोज मांढरे , विश्वस्थ राजेंद्रकृष्ण कापसे , सुभाष भांबुरे , राजेन्द्र मारणे यांच्या सह सायकल यात्री उपस्थित होते . आज ही यात्रा पहूर , जामनेर ,बोधवड मार्गे मुक्ताईनगरला मुक्कामी पोहोचली .

या यात्रेचे चंदिगड येथे पंजाबचे राज्यपाल राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे सोहळ्याचे स्वागत करतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या दिवशी म्हणजे ११ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र घुमान येथे ही रथ व सायकल यात्रा पोचणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे