रावेर
श्री व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर येथील तीन खेळाडू मानसी, नंदीनी आणि रोहन यांची अखिल भारतीय तायकांदो स्पर्धेसाठी निवड..
(रावेर – हमीद तडवी )
अमृतसर येथे होणाऱ्या दि 6 ते 12 नोहेंबर अखिल भारतीय तायकांदो स्पर्धेसाठी श्री व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर येथील महीला खेळाडू मानसी पाटील,नंदीणी महाजन पुरुष गटाट रोहन लोणारी या तीन खेळाडूंची निवड कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात झाली असून या निवडीबाबत महाविद्यालयाचे अध्यक्ष हेमंतशेठ नाईक, संस्थेचे सदस्य डॉ प्रतीक नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनील पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस यु पाटील,प्रा संदिप धापसे, नॅक समन्वयक डॉ एस जी चिंचोळे, क्रीडा समितीचे सदस्य प्रा चतुर गाडे, प्रा नरेद्र घुले क्रीडा संचालक डॉ उमेश पाटील इत्यादींनी सदर खेळाडूंना अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.