व्हॅगनार कारचे टायर फुटल्याने अपघात मोटरसायकल चालक जागीच ठार..
क्रूर काळाने मामा सोबत भाच्याला सुद्धा नेले.
यावल दि.७ ( सुरेश पाटील ) – मामाच्या अंत्यविधीसाठी डिझेल आणण्यासाठी दुचाकी वाहनाने यावल येथे येत असताना व्हॅगनार चार चाकी वाहनाचे टायर फुटल्याने मोटरसायकलला जोरदार धडक दिली या अपघातात मोटर सायकल चालक जागीच ठार झाला सदरची घटना यावल चोपडा रोडवर महाजन पेट्रोल पंपाच्या पुढे आज सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडली.क्रूर काळाने मामा सोबत एकुलता एक असलेल्या भाच्याला सुद्धा सोबत नेल्याने साकळी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील साकळी येथील करण विजू जंजाळे वय ३० याच्या मामाचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी करण हा आपल्या मोटरसायकलीने यावल येथील महाजन पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी येत असताना यावलकडून साकळी गावाकडे जाणाऱ्या वॅगन आर क्र.एम.एच.१९-एपी.३२७३ या चार चाकी वाहनाचे टायर फुटल्याने ते वाहन किरण जंजाळे यांच्या मोटरसायकलवर जोरात आढळले त्या अपघातात किरण जंजळे हा एकुलता एक मुलगा जागीच ठार झाल्याची घटना घडल्याने क्रूर अशा काळाने मामा सोबत भाच्याला सुद्धा नेल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.