रावेर पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..
रावेर प्रतिनिधी / कमलेश पाटील
रावेर – येथील शासकीय विश्रामगृहा जवळ असलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे वार्षिक स्नेह संमेलन दिवस समारोह मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विशेष अतिथी म्हणून लाभलेले जळगाव पोदार इंटरनॅशनल स्कूल चे प्रिन्सिपल गोकूल महाजन यांनी मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. सुयोग्य हॉस्पिटल चे संचालक डॉ.गुलाब पाटील यांनी, “पालकांनी आमच्या संस्थेवर दाखवलेला विश्वास ही आम्हाला पुढील वाटचालीसाठी बळ आहे” असं मत व्यक्त केले.
तद्नंतर ‘हरे कृष्णा हरे राम’ गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इयत्ता साहवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी ‘स्वागत स्वागत है’ पर गीत सादर केले. ‘चक चक दे सारे गम, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, पापा कहते हे बडा नाम करेगा, शिव तांडव, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जय जवान जय किसान, काठी न घोंगडे घेऊ द्या किरे, मला ही जत्रेला येवू द्या की, अशा अनेक गाण्यावर नृत्य सादर करून विद्यार्थ्यानी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत कार्यक्रमांचे आयोजन जोरदार संपन्न झाले. पोदार इंटरनॅशनल स्कूल चे विद्यार्थी विद्यार्थिनी सादर केलेले नृत्य बघून रावेर मध्ये प्रथमच असा कार्यक्रम झाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले.
यावेळी रावेर पोदार स्कूल च्या प्रिन्सिपल सुचिता पाटील व सर्व शिक्षक यांच्या अतूट मेहनतीने हा कार्यक्रम जोरदार झाल्याचे पालक वर्गातून बोललं जातं होतं.
समारोहाला विशेष अतिथी जळगाव येथील पोदार स्कूलचे प्रिन्सिपल गोकूल महाजन सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्यातील निबोंल येथील प्रगतशील शेतकरी भागवत पाटील, रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी पवन बनवे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, पवनराजे पाटील, पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, महिला पोलिस फौजदार दिपाली पाटील व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी चे पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.