3 हजारांची लाच कुसुंब्याचा तलाठी ACB च्या जाळ्यात..
जळगाव – कुसुंबा येथील तलाठ्यास 3 हजारांची लाच घेतांना जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने लाच खोरांच्या गोठ्यात एकच खडबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांनी त्यांचे आई व भावाचे नाव 7/12 उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबत नितीन शेषराव भोई, तलाठी यांनी 5000/- रुपये लाचेची मागणी केली होती.त्याबाबत तक्रारदार यांनी आज दिनांक 07 रोजी तक्रारदार यांनी समक्ष लाप्रवि जळगांव यांना तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान यातील नितीन शेषराव भोई, तलाठी यांनी 7/12 उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी प्रथम 5000/- ,4000,/- रुपये व तडजोडअंती 3000 रुपयाची लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर यातील नितीन शेषराव भोई, तलाठी यांना आज दि.07 रोजी 3000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रांगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचेवर MIDC पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सदर कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर,पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे,Asi सुरेश पाटील चालक,
पोना बाळू मराठे ,पोकॉ अमोल सूर्यवंशी यांनी केली.