जळगाव – शहरातील तक्रारदार यश मनोहरलाल अहुजा वय 24 वर्ष रा, केमीस्ट भवन जळगाव यांनी फिर्याद दिली की, दि. 30 रोजी सिंधी कॉलनी सेवामंडळ जळगाव येथे मंदीरात सीबी झेड मो.सा क्र. एम.एच. 19 बीए 1737 ही रात्री 08.00 वा लावुन मंदीरात निघुन गेला होता. 09.00 वाजता फिर्यादी हे मोटर सायकल लावलेल्या ठिकाणी आले असता त्यांना सदर ठिकाणी मोटर सायकल लावलेली दिसुन आली नाही. त्यांनी सदर मोसा चा शोध घेतला असता सदर मोटर सायकल ही कोठेच मिळुन न आल्याने दिनांक 31 रोजी मोटर सायकल चोरी गेल्याबाबत फिर्याद दिली होती गुन्हा रजिस्टर नंबर 248/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत , पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोधपथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना घटनास्थळाची पाहणी करुन आरोपीतांचा शोध घेणेबाबत सुचन दिल्या होत्या.
त्यानुसार गुन्हे शोधपथकाने सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन दोन ईसम हे सीबी झेड मोटार सायकल काढतांना दिसले. त्याप्रमाणे दोन पथके तयार करुन शोध घेण्यास सुचना दिल्या. शोध घेत असतांना शनीपेठ पोस्टे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आकाश संजय मराठे हा सदर मोटर सायकल काढतांना दिसुन आल्याने त्यास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेवुन त्यास अटक करुन त्याचे सोबत असलेल्या साथीदाराबाबत विचारपुस करता त्याने त्याचे सोबत माधव श्रावण बोराडे हा असल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपीतांना अटक केली असुन त्यांचे कडुन 80,000/-रुपये किंमतीची सीबी झेड मो.सा क्र. एम.एच. 19 बीए 1737 आणी जळगाव शहर पोस्टे गुरनं. 128/2025 बीएनएस कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्हयातील 60,000/- रुपये किंमतीची हीरो कंपनीची एचएफ डीलक्स मोसा क्र. एमएच 19 बीटी 6945 अशा एकुण 140,000/- रुपये किंमतीच्या दोन मोसा हस्तगत करण्यात आल्या.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली.