यावल दि.३ ( सुरेश पाटील ) – तालुक्यातील मनवेल शिवारात थोरगव्हाण येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील शेतकऱ्यांच्या उभ्या केळीचे घड अज्ञात माथेफेरूने विळ्याच्या साह्याने ५० केळीच्या झाडे कापुन अंदाजे १ लाख रुपयाचे नुकसान केले आहे.
मनवेल येथील महेंद्र हुकुमचंद पाटील यांची थोरगव्हाण रस्त्यावर गट नं.१०० व जंयत रमांकात पाटील यांच्या गट नं.१७० मध्ये दोन्ही शेतकऱ्यांनी जैन टिश्युचे रोप असलेली नवती केळी लागवड केली असून केळीचे निसवन झालेले ५० घड अज्ञात माथेफेरूने विळ्याने कापुन नुकसान केल्याने एकच खळबळ उडाली आहेहि घटना ३ एप्रिल रोजी दुपारच्या दरम्यान घडली असून सायंकाळी शेतमालक शेतात फेरफटका मारायला गेला असता केळीचे निसवन झालेले घड अर्ध्या मधुन कापुन पडलेले दिसून आले आहे
अज्ञात माथेफेरू विरुद्ध यावल पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात येत असून सदर प्रकार गंभीर असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्या माथेफेरूच्या पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहे.असाच प्रकार मागील तीन महिन्यात आणि त्याआधी यावल आणि अट्रावल शिवारात दोन-तीन वेळा झाल्याने पोलिसांनी अज्ञात माती फिरूचा शोध घेऊन कडक कारवाई करावी अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.