जळगाव

जळके शिवारात ५५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यावर वार करून निर्घृण खून..

जळगाव | प्रतिनिधी – जळगाव तालुक्यातील जळके शिवारात एका ५५ वर्षीय व्यक्तीची डोक्यावर घातक वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. गोरख विठ्ठल ठाकूर (वय ५५, रा. अंतुर्ली, हल्ली मुक्काम पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे जळके व शिरसोली परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोरख ठाकूर हे गेल्या आठ दिवसांपासून शिरसोली येथील नातेवाईक ज्ञानेश्वर राजाराम ठाकूर यांच्याकडे आले होते. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ते ज्ञानेश्वर ठाकूर यांच्या जळके शिवारातील शेतात गेले होते. याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर जोरदार वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, शेतात काहीतरी वाद सुरू असल्याची माहिती संशयिताच्या नातेवाईकाकडून घरी देण्यात आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. त्यानंतर या घटनेची माहिती उघड झाली. या प्रकरणात शिरसोली येथील मुकुंदा प्रल्हाद पाटील याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण, वादाचे स्वरूप आणि घटनेतील संशयिताची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही पोलिसांनी भेट देऊन पुढील तपासाच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, संशयिताचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिस तपासानंतरच हत्येचे नेमके कारण आणि घटनेतील दोषी कोण, हे स्पष्ट होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे