महाराष्ट्र

जि. प. शाळा सुवरधराच्या जन माहितीं अधिकाऱ्याला कायद्याचे उलंघन भोवले

चौकशी करून कार्यवाही करण्याचे शिक्षणाधिकारी द्वारे आदेश

पारशिवनी :- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कायद्याच्या नियमांचे उलंघन केल्या प्रकरणी विवादित असलेली जि. प. शाळा सुवरधराच्या जन माहितीं अधिकारीला कायद्याचे उलंघन चांगलेच भोवले आहे . माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या तक्रारीवर गंभीर दखल घेत शिक्षण सहसंचालक , शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी त्या जन माहितीं अधिकारी यांच्या वर चौकशी करून दोषी आढळल्यास कार्यवाही करने व अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश पारित केले आहे . याची जबाबदारी पारशिवनीचे गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आली असून आता त्या विवादित शाळेच्या जन माहितीं अधिकारीवर होंणाऱ्या कार्यवाहिकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .

माहितीं अधिकार कार्यकर्ता महासंघचे पदाधिकारी पंचशील वाळके यांनी पारशिवनी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सुवरधरा येथे वेगवेगळ्या विषयांवर एकूण दहा माहितीचा अधिकार अर्ज केले होते. यावर शाळेचे जनमाहिती अधिकारी असलेले कनिष्ठ कुर्मा कोडवते यांनी दहा अर्ज़ाविषयी एकाच पत्रात उत्तर व माहितीं देवून अर्जदाराची बोळवन करण्याचा प्रयत्न केला . सोबतच दहा अर्ज़ाचे एकाच पत्रात उत्तर देवून दिशाभूल करने, अर्ज़ात माहितीचा संबंधित कालावधी स्पष्ठ नमूद असूनही कालावधी नमूद नाही अशे म्हणून माहितीं देण्यास टाळाटाळ करने, कोणत्याच विषयाचे शुल्क भरावे हे नमूद नसने, कार्यालयातील सर्व अभिलेखांचे वर्गीकरण करून संगणीकृत न करने, अर्ज व अपिलांशी संबंधित पत्रव्यवहार करताना प्रत्येक पत्रावर शासनाने निश्चित केलेला माहितीचा अधिकार लोगो (बोधचिन्ह) व स्टाम्प न वापरने , शुल्क भरनेसाठी निहित केलेले बैंक चालानची प्रत हे शुल्क मागणी पत्र (डिमांड लेटर) सोबत न जोड़ने , किरकोळ माहितीला मोघम सांगने, साध्या पानावर उत्तर देने, पत्रावर शेवटी प्रथम अपिलिय अधिकारिचा तपशील नमूद न करने , अर्ज व अपिलां संबंधी पत्रव्यवहार करताना स्वताचे नाव, पदनाम, कार्यालयचे नाव न लिहिता शासनाचे निणर्य व परिपत्रकांचे सर्रास उलंघन केल्या प्रकरणी अपीलार्थी पंचशील वाळके यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सुवरधरा येथील जनमाहिती अधिकारी असलेले कनिष्ठ सहायक यांची जिल्हाधिकारी, सीईओ, शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक , शिक्षण आयुक्त, उपसंचालक , राज्य माहितीं आयुक्त खंडपीठ नागपुर, शिक्षण मंत्री , सामान्य प्रशासन विभाह व शिक्षण विभागचे मुख्य सचिव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून कार्यवाहिची मागणी केली होती . या प्रकरणात केलेली चौकशी व कार्यवाही विषयी अधिक माहितीं घेणेसाठि पारशिवनीच्यां गट शिक्षणाधिकारी वंदना हटवार यांना संपर्क केला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे