गुन्हेगारीपारोळा

परोळ्यात गावठी कट्ट्यासह एकास अटक ; LCB ची कारवाई..

पारोळा – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सुहास बावीस्कर, रा.कानळदा ता.जि.जळगाव हा त्याचे कब्ज्यात गावठी कट्टा (पिस्टल) घेवून दहशत माजविण्याचे उद्देशाने देवगाव ता. पारोळा येथे आल्याची बातमी मिळाली.

त्यावरून देवगाव शिवार ता. पारोळा येथे जावून मिळालेल्या बातमीची खात्री करून सुहास बावीस्कर यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुहास भरत बावीस्कर, रा. कानळदा ता.जि. जळगाव असे सांगीतले त्यावरून त्याचे अंगझडती घेता त्याचे ताब्यात १५,०००/- रु. कि.चे १ गावठी बनावटीची पिस्टल व ४,०००/- रु. कि.चे २ जिवंत काडतुस मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे विरुध्द पारोळा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचे पुढील तपासासाठी पारोळा पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी दत्तात्रय पोटे, श्रेपोउनि अनिल जाधव, पोह दिपक माळी, रविंद्र पाटील, विलेश सोनवणे, हेमंत पाटील, प्रदिप चवरे यांनी केली

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे