महाराष्ट्र

मैत्रेय कंपनी विरोधात मुंबई सेशन कोर्ट येथे मैत्रेय असोशियशन कडून वकीलपत्र दाखल

दसनुर प्रतिनिधी :- पुरुषोत्तम संगपाळ 

मैत्रेय उपभोक्ता एवंम अभिकर्ता आसोसिएशन यांच्या वतीने मैत्रेय कंपनीच्या विरोधात मुंबई सेशन कोर्ट येथे वकील देण्याची प्रक्रिया दिनांक 06.04.2023 रोजी पूर्ण केली आहे. मैत्रेय असोसिएशन यांच्या वतीने एडवोकेट विनायक पाटील साहेब यांनी मुंबई सेशन कोर्टात वकीलपत्र दाखल केले असून मैत्रेय कंपनीने केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या विरोधात लाखो गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी गुंतवणूकदारांच्या बाजूने बाजू मांडणार आहे..

मैत्रेय असोसिएशनच्या वतीने संपूर्ण तळागाळातील गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत..यासाठी असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे अध्यक्ष -ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष -सुरेश सपकाळे, सचिव- निलेश वाणी, खजिनदार मंगल परदेशी, पिंटू दर्डा, नानासाहेब पाटील, राजेंद्र सुतार, यासीन सय्यद, संजय बारी, प्रवीण पाटील, राजू पाटील, विनायक चव्हाण, दत्तात्रय शिंगाडे, व असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते भैय्यासाहेब माळी यांनी मेहनत घेतली आहे.शेवटच्या गुंतवणूकदाराला त्याचा परतावा मिळवून देईपर्यंत असोसिएशनच्या वतीने लढा दिला जाणार आहे.मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीच्या जप्त झालेल्या प्रॉपर्टी कोर्टात कडून विक्री करण्याचे लवकरात लवकर आदेश प्राप्त व्हावेत व शासनाने ते विकून गुंतवणूकदारांना त्यांच्या कष्टाचा पैसा त्यांना परत मिळवून द्यावा यासाठी असोसिएशनच्या वतीने कार्य सुरू आहे ….

असोसिएशन यांच्या वतीने गेल्या सहा वर्षापासून लाखो गुंतवणूकदारांना त्यांचा हक्काचा परतावा परत मिळावा यासाठी लढा देत आहे. असोसिएशनने अनेक मोर्चे आंदोलने केली असून सर्व आमदारांना व खासदारांना निवेदन देखील आहेत . तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्री महोदय यांना देखील निवेदन दिली आहे परतवा मिळून द्यावा या साठी सहकार्य करावे या आशेची निवेदन दिले आहे ..सातत्याने मंत्रालय व संबंधित तपास अधिकाऱ्यांची गाठीभेटी व बैठकींचा सत्र देखील असोसिएशनच्या वतीने सुरू आहे .मैत्रेय पीडितांना आता न्यायदेवता कडून अपेक्षा आहे .. त्यांना न्याय मिळेल आणि त्यांच्या कष्टाचा घामाचा पैसा त्यांना परत मिळेल. अशी माहीती असोसिएशन मिडीयाप्रमुख यासीन सय्यद यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे