क्रिडा व मनोरंजनजळगाव

एकलव्य क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेस उत्साहात सुरवात 

जळगाव (प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे मान्यतेने एकलव्य क्रीडा संकुल आयोजित दुसरी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेस एकलव्य क्रीडा संकुल येथे उत्साहात सुरवात झाली या स्पर्धेचे उदघाटन उज्वल स्पराऊटर्स स्कुलच्या प्राचार्या मानसी भदादे यांनी श्रीफळ वाढवून केले

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव, कलादर्शचे संचालक सचिन चौगुले, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक डॉ रणजित पाटीलव रवि कांकरिया यांची उपस्थिती होती उपस्थितांचे स्वागत NIS टेबल टेनिस प्रशिक्षक विजय विसपुते, शैलेश जाधव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड विक्रम केसकर यांनी केले

प्राचार्या मानसी भदादे यांनी उपस्थित खेळाडू यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन स्पर्धेस जिल्ह्याभरातून खेळाडू सहभागी झाल्याबद्दल त्यांचे प्रशिक्षक व पालक यांचे कौतुक केले स्पर्धेत जिल्ह्याभरातून असंख्य स्पर्धक सहभागी झाले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे