चोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; डोक्यात दगड टाकून खून..
चोपडा : तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावानजीक शेतात एक परिवार वास्तव्यास आहे. यातील 11 वर्षीय मुलगी ही शनिवारी सायंकाळी घराजवळ असताना संशयित तेथे आला आणि त्याने या मुलीला शेताकडे नेत अत्याचार केला. यानंतर संशियाताने डोक्यात दगड टाकून तिचा खून केला. दरम्यान, ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करत याबाबत माहिती दिली.
यानंतर चोपडा शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच यावेळी फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली. बालिकेचा मृतदेह रात्री उशिरा चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान, जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.