जळगाव

रोझलँड ग्रुप ऑफ स्कूल्स जळगांव,आयोजित रान कविता महोत्सवात दोनशे विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग

जळगांव(प्रतिनिधी) दि.१६ – रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल व रोझलँड प्राथमिक विद्या मंदिर जळगांव आयोजित कविवर्य ना.धो.महानोर यांच्या जयंती निमित्त रानकवीता महोत्सव अंतर्गत

शनिवार रोजी ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी कविवर्य ना.धो. महानोर यांचे नातू श्री. शशी महानोर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून करण्यात आली.  रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम चे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आज खान्देश रत्न ना.धो. महानोर यांची 81 वी जयंती, त्या निमित्त कविता लेखन आणि सादरीकरण ही कार्यशाळा घेण्यात आली . या कार्यशाळेमध्ये डॉ.उषा शर्मा,प्रा. व्ही. गणेशन, संदीप मेहता, कवयित्री निखत मेहमूद ,संगीतकार मिलिंद जोशी यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. शशी महानोरांनी ना. धो. महानोर यांच्या आठवणी सांगून ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन केले. शाळेच्या अध्यक्षा रोजमीन खिमानी प्रधान यांनी कार्यशाळेची धुरा सांभाळली. विद्यार्थ्यांना कमीत कमी शब्दात आपल्या भावना मांडण्यासाठी शब्दांची निवड कशी करावी. काव्यरचनेतील वेगवेगळे प्रकार हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेत शिकायला मिळाले.तसेच लेखन कौशल्य वाढविण्यासाठी निश्चितच या कार्यशाळेचा अनुभव कामी येईल.असे सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांनी या प्रसंगीआपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्याध्यापिका वंदना सोले, सीता तिवारी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. उपमुख्याध्यापिका प्रीतम सिन्हा , विनोद घोलाने , पिरण पाटील,भावना शिंपी, निशा पाटील या शिक्षकानी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका कोळी यांनी केले. आणि तंत्रज्ञान विभाग नावेद निजामी व राजेश सपकाळे यांनी सांभाळले. या ऑनलाईन कार्यशाळेस नाचनवेल येथील कैलास साळुंके यांनी गुगल मीटला सहकार्य केले , तसेच औंरंगाबाद जिल्ह्यातील मोहरा येथील पुंडलिकराव पाटील हायस्कूल मधील ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला हे विशेष होय. या ऑनलाईन कार्यशाळेचा जिल्हा व शहरातील प.न लुंकड कन्या शाळा,प्रगती माध्यमिक शाळा,आश्रम शाळा, केकतनिंभोरे जामनेर.,कै. गी. न .चांदसरकर माध्यमिक विद्यालय,बालमोहन मराठी शाळा, बहिणाबाई माध्यमिक विद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल,उर्दू हायस्कूल जळगाव,मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव,काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल,सेंट टेरेसा हायस्कूल,माध्यमिक विद्यालय शारदा कॉलनी,आय एन एस हायस्कूल जळगाव,नंदिनीबाई विद्यालय जळगाव,पुंडलिकराव पाटील हायस्कूल मोहरा,आदर्श सिंधी हायस्कूल,ईकरा हायस्कूल,जिजामाता माध्यमिक विद्यालय,श्री समर्थ माध्यमिक विद्यालय आव्हाने शिवार आदी पंचवीस शाळांतील दोनशे विद्यार्थी व आणि शिक्षकांनी लाभ घेतला.प्रमुख पाहुणे शशी महानोर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कविवर्य ना. धो महानोर यांच्या वाढदिवसानिमित्त गोड खाऊ देण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. *फोटो कॅप्शन* : रान कविता महोत्सव प्रसंगी कविवर्य स्व..ना. धो.महानोर यांच्या प्रतिमेस अभिवादन करतांना. प्रमुख पाहुणे शशी मनोहर त्यांचे समवेत मुख्याध्यापिका सिता तिवारी, भावना शिंपी, निशा पाटील, उपमुख्याध्यापिका प्रीतम सिन्हा, वंदना सोले, विनोद घोलाने, जितेंद्र सोनावणे,पिरण पाटील, सौ. प्रियांका कोळी.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे