जळगाव

पंढरपूर ते घुमान भव्य रथ व सायकल यात्रेचे २७ नाेव्हेंबर राेजी जळगाव जिल्हयात पहूर येथे आगमन

जळगाव– संत शिराेमणी नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंतीिनमित्त भागवत धर्म प्रसारक मंडळ व पालखी साेहळा पत्रकार संघ अ भा क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने २३ नाेव्हेंबरपासून पंढरपूर ते घुमान भव्य रथ व सायकल यात्रेचे आयाेजन करण्यात आले आहे  सदर सायकल यात्रेचेे २७ नाेव्हेंबर राेजी सकाळी ८ वाजता जळगाव जिल्ह्यातील पहूर (ता.जामनेर) येथे आगमन होणार आहे. तरी या रथ व सायकल यात्रेसाठी मोठ्या संख्येने समाजबांधव वारकरी संप्रदाय व संत नामदेव महाराजांचे अनुयायी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाचे प्रदेशाध्यक्ष महेशजी ढवळे, राज्य संघटक मनोज भांडारकर, अ भा राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार,जळगाव जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी रथयात्रेचे आयोजक सूर्यकांत भिसे, मनोज मांढरे, राजेंद्र सोनवणे, विवेक जगताप ,मुकुंदराव मेटकर, पी टी शिंपी शरदराव बिरारी जिल्हा युवक अध्यक्ष तुषार शिंपी जितेंद्र शिंपी संजय ईसइ शेंदुर्णी डॉ.श्रीराम शिंपी पाळधी प्रभाकरराव शिंपी बोदवड प्रा शरद काठोके जामनेर, SR टेलर्स यानी या भव्य रथयात्रेचे स्वागता साठी शिंपी समाज बांधव व जळगाव जिल्ह्यातील वारकरी संप्रदाय, सायकल प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने या भव्यरथ यात्रेचे स्वागतासाठी पहुर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे