
जळगाव – येथील विद्युत निरीक्षकास १५ हजाराची लाच घेतांना जळगाव एसीबी च्या पथकाने रंगेहाथ पकडले. असुन गणेश नागो सुरळकर (विद्युत निरीक्षक वर्ग १) खाते उद्योग,उर्जा व कामगार विभाग जळगांव असे त्याचे नाव व पद असुन या कारवाईने लाचखोरांच्या गोठ्यात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे कंत्राटदार असून ते शासनाचे इलेक्ट्रिकल कामे करीत असतात त्यांचे कडे यासाठी लायसन्स आहे. सदरचे लायसन्स नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांनी गणेश नागो सुरळकर निरीक्षक वर्ग 1,खाते उद्योग,उर्जा व कामगार विभाग जळगांव यांचेकडे अर्ज केला होता. सदर लायसन्स चे नूतनीकरण करण्यासाठी विद्युत निरीक्षक गणेश नागो सुरळकर यांनी तक्रारदार यांचेकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी करून आज रोजी पंचा समक्ष लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हा सापळा सुहास देशमुख,पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.अमोल वालझाडे , पोलीस निरीक्षक , एन. एन. जाधव , पोलीस निरीक्षक ,, सफौ दिनेशसिंग पाटील ,स.फौ.सुरेश पाटील,पोकॉ प्रदिप पोळ, पोकॉ. राकेश दुसाने पो.कॉ,प्रणेश ठाकुरपो.ह.रविंद्र घुगे, पोहेकॉ शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पोना बाळू मराठे ,पो शी अमोल सूर्यवंशी, आदींच्या पथकाने यशस्वी केला