30 हजाराची लाच : ऊत्राण चे दोघ तलाठी ACB च्या ताब्यात..
वाळूच्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी घेतली लाच.

एरंडोल – उत्राणच्या दोघ तलाठ्यांना 30 हजाराची लाच घेतांना जळगाव एसीबीने रंगेहाथ पकडले असून 1) नरेश भास्कर शिरूड, तलाठी सजा उत्राण अहिर (खाते महसुल विभाग वर्ग-३)२) शिवाजी एकनाथ घोलप तलाठी सज्जा उत्राण गुजर (खाते महसुल विभाग वर्ग-3)असे त्यांचे नावे आहेत.
यातील तक्रारदार यांचे उत्राण गिरणा नदीपात्रात नरेश भास्कर शिरूड, तलाठी सजा उत्राण अहिर यांनी वाळू चे भरलेले टॅक्टर दि. २७ रोजी सकाळी पकडले होते सदरचे टॅक्टर नंतर सोडून देण्यात आले होते. सदर वाळूने भरलेले ट्रैक्टर सोडले व कारवाई केली नाही म्हणून नरेश भास्कर शिरूड, तलाठी सजा उत्राण अहिर यांनी टॅक्टर सोडताना २५,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि. २७/०१/२०२६ रोजी ला.प्र.वि. जळगाव यांच्या कडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. २७ रोजी पंचा समक्ष एरंडोल येथे लाच मागणी पडताळणी केली असता नरेश भास्कर शिरूड, तलाठी यांनी तक्रारदार यांचे गिरणा नदीपात्रात वाळूचे भरलेले ट्रक्टर पकडलेले होते. सदरचे टॅक्टर सोडल्याचा मोबदल्यात व कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ठरल्याप्रमाणे २५,०००/- रुपये बिलकुल घेणार नाही. इतरांकडून जास्त घेतो, तू गरीब आहे म्हणून तुझ्याकडून फक्त ३० हजार रुपये घेतोय अस सांगून ३०,००० रुपये लाचेची मागणी करून शिवाजी एकनाथ घोलप तलाठी सज्जा उत्राण गुजर (खाते महसुल विभाग वर्ग-3) यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.सदर लाच मागणी पडताळणी झाल्यानंतर लगेच सापळा कारवाई केली सदर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरती राहत असलेल्या एका रूम मध्ये शिवाजी घोलप, तलाठी यांनी नरेश भास्कर शिरूड, तलाठी याचे उपस्थितीत ३०,०००/- रुपये लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले.
सदर कारवाई दरम्यान तलाठी नरेश भास्कर शिरूड यांचे कडून १,७३,३००/- रुपये रोख २९५०/- रुपये किंमतीची एक Paul John कंपनीची ७५०ml व्हिस्की बॉटल (गिफ्ट रॅपर मध्ये पॅक असलेली) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई
जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक,योगेश ठाकूर, स्मिता नवघरे, पोलिस निरीक्षक,पो.नि. हेमंत नागरे, पो अं/प्रदीप पोळ, पो अं/अमोल सुर्यवंशी व पो.अं./सचिन वाटे यांनी केली.