तळागळातील प्रभावशाली शैक्षणिक उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या CEO श्रीमती मिनल करनवाल यांना जागरण जोश पुरस्कार प्रदान..
जळगाव :-तळगळातील सर्व समावेशक आणि प्रभावशाली शैक्षणिक उपक्रमांना पुढे नेण्याच्या अपवादात्मक कार्याची दखल घेऊन जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांना दिल्ली येथे “जागरण जोश “ अवॉर्ड्स २०२५ मध्ये एक्सलन्स इन ग्रासरुट लेव्हल एज्युकेशन पुरस्काराने बुधवार दि.९ एप्रिल २०२५ रोजी गौरविण्यात आले.
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्यरत असताना श्रीमती करनवाल यांनी शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासह शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामांची दखल घेत जागरण न्यूज ग्रूप च्या जागरण जोश या उपक्रमांतर्गत त्यांना बुधवार दि ९ एप्रिल रोजी दिल्ली येथे एका पंचतारांकित हॉटेल मध्ये आयोजित कार्यक्रमात भारत सरकारचे शिक्षण विकास मंत्री डॉ.सुकांता मुजुमदार यांचे हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी यांचे सह सामाजिक क्षेत्रात काम करणारे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या श्रीमती मिनल करनवाल यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे जळगाव जिल्हा परिषदेच्या नाव लौकिकात भर पडली आहे.