जळगाव

मुरुम माफीयांचा जिल्ह्यात धुमाकुळ : २९ प्रकरणांत ७७ लाखांचा दंड..

२१ लाखांची वसुली अजूनही बाकी..

जळगाव : जिल्ह्यात  मुरुम माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून,  अवैध मुरुम उत्खननाची २९ प्रकरणे समोर आली आहेत. यात तब्बल ७७,३५,०६० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यापैकी २१ लाख ९ हजार रुपयांची वसुली अद्याप बाकी आहे.१ एप्रिल २०२५ ते २१ जानेवारी २०२६ या काळात महसूल विभागाची कारवाई

भुसावळ आणि मुक्ताईनगर भागात कारवाईचा धडाका दिसला असला, तरी काही तालुक्यांत मात्र कारवाई बाबत उदासीनता दिसून येत आहे.

जळगाव तालुका: येथे मुरुमाचे एकच प्रकरण समोर आले असून २ लाख २३ हजार रुपयांचा दंड अद्याप एक रुपयाही वसूल झालेला नाही.

भुसावळ : येथे १२ प्रकरणांमध्ये २९ लाख ३२० रुपयांचा दंड आकारला गेला. त्यापैकी १८ लाख २ हजार रुपये वसूल झाले असून, १० लाख ९७ हजार रुपये अजूनही थकित आहेत. येथे एका माफियावर गुन्हाही दाखल झाला आहे.

मुक्ताईनगर : येथे ५ प्रकरणांत १४ लाख ११ हजार रुपयांचा दंड झाला असून, सर्वाधिक २३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. येथे ३ गुन्हे दाखल करून प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

जामनेर: येथे एका प्रकरणात २ लाख ३५ हजार रुपयांचा दंड झाला आणि त्याची १०० टक्के वसुली करण्यात आली आहे.

यावल: येथेही एका प्रकरणात १२ लाख ४८ हजार रुपयांचा मोठा दंड आकारून तो पूर्णपणे वसूल करण्यात आला आहे.

मुरुम उत्खनन कारवाई : (१ एप्रिल २५ ते २१ जानेवारी २६)

भुसावळ -१२ प्रकरणे,२९,००,३२०दंड रक्कम (रु.),१८,०२,६४०वसूल रक्कम (रु.),१०,९७,६८०शिल्लक दंड (रु.)१२ वाहने / १ गुन्हा

मुक्ताईनगर-०५ प्रकरणे,१४,११,२४० दंड रक्कम (रु.)११,८१,४४०वसूल रक्कम (रु.),२,२९,८००. शिल्लक दंड (रु.),२३ वाहने / ३ गुन्हे

यावल-०१ प्रकरणे,१२,४८,००० दंड रक्कम (रु.),१२,४८,०००वसूल रक्कम (रु.),१ वाहन

रावेर-०३ प्रकरणे६,७१,५२० दंड रक्कम (रु.)२,२३,८४०वसूल रक्कम (रु.)४,४७,६८०. शिल्लक दंड (रु.)३ वाहने

अमळनेर – ०३ प्रकरणे,५,८५,२२८ दंड रक्कम (रु.)५,८५,२२८वसूल रक्कम (रु.),०. शिल्लक दंड (रु.),३ वाहने

भडगाव- ०२ प्रकरणे,३,३७,७०२. दंड रक्कम (रु.),२,२६,८८४वसूल रक्कम (रु.),१,१०,८१९. शिल्लक दंड (रु.),२ वाहने

जळगाव –०१ प्रकरणे,२,२३,८४० दंड रक्कम (रु.)०. वसूल रक्कम (रु.),२,२३,८४०. शिल्लक दंड (रु.)१ वाहन

चाळीसगाव – 1 अनधिकृत वाहतूक व उत्खनन प्रकरणांची संख्या 121450 दंडाची रक्कम 121450 वसूल रक्कम

29 प्रकरण

7735060 एकूण दंड.

5625242 वसूल दंड. 

2109819 शिल्लक दंड.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे