३० हजारांची लाच : तलाठ्यासह मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात..

जळगाव : वाळूने भरलेला डंपर सोडून कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर जळगाव एसीबीची कारवाई.
तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. दि. ०४/०२/२०२६ रोजी रात्री १०.३० वा. तलाठी सदानंद मुंडे यांनी वाळूने भरलेला डंपर पकडला होता. त्यानंतर मंडळ अधिकारी अभिजित येवले यांनी फोन करून सांगितल्यावरून सदर डंपर सोडण्यात आला. डंपर सोडून कारवाई न करण्याच्या बदल्यात तलाठी सदानंद व्यंकटी मुंडे, व मंडळ अधिकारी अभिजित नामदेव येवले या दोघांनी तक्रारदाराकडे ५०,०००/- रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. ११/०२/२०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे लेखी तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केली असता ५०,०००/- रुपयांची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती ३०,०००/- रुपये देण्याचे ठरले. सापळा रचून ही रक्कम तलाठी सदानंद मुंडे यांनी स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
सदर कारवाई मंडळ अधिकारी अभिजित येवले यांच्या जुन्या जळगाव येथील घरातील खाजगी कार्यालयात करण्यात आली. दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान तलाठी सदानंद मुंडे यांच्याकडून रोख ४०,२००/- रुपये व एक Vivo कंपनीचा मोबाईल फोन तसेच मंडळ अधिकारी अभिजित येवले यांच्याकडून रोख ७,६००/- रुपये व एक Vivo कंपनीचा मोबाईल फोन असा मु्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई – एसीबीचे पोलिस उपअधिक्षक,योगेश ठाकूर,स्मिता नवघरे, पोलिस निरीक्षक, रेश्मा अवतारे, GPSI सुरेश पाटील, चालक, पोना/बाळु मराठे, पोकॉ/ राकेश दुसाने, पोकों/प्रदिप पोळ, पोकॉ/ चंद्रशेखर चौधरी यांनी केली.