जळगावजळगाव जिल्हा

जळगावच्या इकरा युनानी मेडीकल कॉलेज पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात !

जळगाव : प्रतिनिधी 

जागतीक युनानी दिवसच्या निमित्ताने इकरा युनानी मेडिकल कॉलेज मध्ये दिनांक ११ रोजी पहिला दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन प्रती कुलगुरु  मिलिंद निकुभ, महाराष्ट्र अरोग्य विज्ञान विद्यापिठ नाशिक , मुंबई येथिल सुप्रसिद्ध मोटेवेशनल स्पीकर डॉ. रौशन जहा शेख, इकरा एज्युकेशन सोसयटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, डॉ. इकबाल शाह, एजाज अहेमद मलिक , डॉ. मो. ताहेर शेख, शेख अमिनोद्दीन बादलीवाला, डॉ. अमनुल्लाह शाह, प्रोफ़ेसर अब्दुल रऊफ शेख, प्रोफ़ेसर जफ़र शेख, प्रोफ़ेसर अब्दुल रशिद शेख, गुलाम नबी बागवान, अब्दुल मजीद झकेरिया, डॉ. जबिऊल्लाह शाह, अब्दुल अजिज सालार, गनी मेमन, तारिक अनवर शेख, आदि सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रती कुलगुरु मा. मिलिंद निकुमभ, महाराष्ट्र अरोग्य विज्ञान विद्यापिठ नाशिक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्याण्चे पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यात आले. मुफ्ती इमरान यांनी कुरान पाठन करुन कार्यक्रमाची सुरुवात केले, सुत्रसंचालन इंडिया 365 चे पत्रकार अयाज मोहसीन यांनी केले. प्रती कुलगुरु मा. मिलिंद निकुमभ यांना हकिम अजमल खान ट्रॉफ़ी देऊन गौरवण्यात आले.

Ist Convocation Ceremony Batch 2016 या विद्यार्थ्यांनी बि.यु.एम.एस. अभ्यासक्रम उत्तिर्ण केलेल्या एकुण 44 विद्यार्थ्यांचे पदवी प्रदान करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रती कुलगुरु मा. मिलिंद निकुमभ यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळेस आपले मनोगत व्यक्त करतांना प्रती कुलगुरु मा. मिलिंद निकुमभ यांनी सांगितले कि महाराष्ट्रा मध्ये युनानी महाविद्यालय फ़क्त सात असुन ते उत्तमरित्या काम करत असुन युनानी पॅथी ही नवाजलेली पॅथी असुन युनानी पॅथीचे औषधोपचार मी स्वता घेतले आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांनी समाजासाठी गरिबासाठी बांधीलकी म्हणुन समाज कार्य केले पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रौशन जहॉ यांनी आपले मत व्यक्त करतांना सर्वाचे डॉक्टर झाल्या बद्दल अभिनंदन केले. व आपण सर्वानी इथे न थांबता पुढ्चे शिक्षण घ्यावे समाजात आपली वेगळी प्रतिष्ठा निर्माण करावी, आई वडिलांचा आदर करावे. तसेच समाजात आपले हतुन गरिबांसाठी चांगले कार्य करावे. डॉ. रौशन जहॉ यांनी आपले अपंगत्वावर कशा प्रकारे मात केली. व समाजात एक वेगळे विशव निर्माण केले याची माहिती दिली. या कार्यक्रमात इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी मनोगत व्यक्त करतांना डॉ. रौशन जहॉ यांच्या जिवनाचे परिचय करुन दिले त्यांने कशा प्रकारे वेगळे विशव निर्माण केले याची माहिती दिली. इकरा एज्युकेशन सोसायटी व इकरा युनानी महाविद्यालय आज पर्यंत केलेल्या कार्याबद्द्ल संगितले. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन केल्या बद्दल प्राचार्य डॉ. अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख तसेच त्यांचे सर्व सहकारी यांचे अभिनंदन केले. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात उपस्थित सर्व प्रमुख पहुणे, इकरा एज्युकेशन सोसायटीचे सदस्य आणि विद्यार्थी व त्यांचे पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, यांचे आभार महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे