यावल

हिंगोणा येथे रात्री विहीरीवर गळ काढण्याच्या कामासाठी गेलेल्या मजुराचा विहीरीत मातीखाली दाबुन दुदैवी मृत्यु

यावल ( प्रतिनिधी )- तालुक्यातील हिंगोणा येथील राहणारा हा मजुर विहीरीवर कामासाठी गेला असता विहीरीत काम करीत असतांना अंगावर माती पडल्याने मातीखाली दबुन गुदमरून त्याचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली असुन , फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी. की हिंगोणा तालुका यावल येथील राहणारा मुबारक रमजान तडवी वय ३२ वर्ष हा दिनांक १७ फेब्रुवारी शुक्रवार रोजी हिंगोणा येथील शेतकरी हुना जयराम चोपडे यांच्या हिंगोणा शिवारातील गट क्रमांक९१७ मध्ये असलेल्या शेतातील विहीरीवर गळ काढण्याच्या कामासाठी गेला असता,रात्री सुमारे १ वाजेच्या वेळेस विहीरीवर काम करीत असतांना अंगावर माती पडून मातीखाली दाबुन गुदमरून मुबारक रमजान तडवी या मजुराचा दुदैवी मृत्यु झाला आहे . याबाबत शेतमालक हुना जयराम चोपडे यांनी दिलेल्या खबरी वरून फैजपुर पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असून , पुढील तपास फैजपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे . मयत तडवी याच्या मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन केले असुन , मरण पावलेल्या मुबारक तडवी यांच्या कुटुंबात पत्नी , तिन मुल असे कुटुंब आहे .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे