जळगाव

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा असे म्हणणारी नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगावचा एका विधवेस स्वबळावर उभे राहण्यासाठी मदतीचा हात

जळगाव:- नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे आज दि. 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय तृतीये च्या शुभ मुहूर्तावर एका विधवेच्या आयुष्याची मुहूर्तमेढ रोवली. जळगाव शहरातील निशा भावसार यांचे पती नरेंद्र भावसार यांनी हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून पंधरा दिवसांपूर्वी आत्महत्या केली . परिस्थिती अत्यंत हलाखीची असून खायला सुद्धा अन्न नाही. पदरात तीन लहान मुलं असून उदरनिर्वाहाचे साधन नाही. अशा परिस्थितीत आत्महत्येचा विचार करणाऱ्या या महिलेच्या घरी जाऊन नारी शक्ती ने प्रत्यक्ष भेट दिली असता पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू आले. त्याचवेळी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने निर्णय घेतला की या महिलेला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वयंरोजगार मिळवून द्यावा. आणि लगेच तातडीने कार्यवाही करण्यात येऊन नारीशक्तीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आर्थिक सहाय्य निधी जमा करून तिला कांदा बटाट्याची व भाजीपाल्यासाठी गाडी उभी करून दिली. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या हातगाडीचे उद्घाटन करण्यात आले. हा व्यवसाय सुरु करून देण्यासोबतच तिच्या व तिच्या मुलांच्या योगक्षेमाची संपूर्ण जबाबदरी नारीशक्ती ने घेतली .

व निशाला आश्वास्त केले . याप्रसंगी नारी शक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा . मनिषा पाटील, लिना पाटील ,विद्या जकातदर ,निता वानखेडकर, आशा मौर्य ,वंदना मंडावरे,हर्षा गुजराथी, नुतन तासखेडकर, नेहा जगताप ,रेणुका हिंगू ,संगीता चौधरी ,सोनम पाटील ,मनिषा देशमुख ,इंदिरा जाधव , ज्योती राणे व पदाधिकारी उपस्थित होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे