जळगाव

नारी शक्तीला प्रोत्साहन-भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनचा १३ वर्षापासूनचा उपक्रम

महिला गोविंदा पथक फोडणार दहीहंडी 

जळगाव – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे गेल्या १३ वर्षांपासून तरूणींसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदा देखील ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपासून काव्यरत्नावली चौकात तरूणींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. 

दहीहंडी उत्सवाचे हे आहे विशेष आकर्षण- महोत्सवात दहीहंडी फोडण्याचा मान महिला गोविंदा पथकाला देण्यात येणार आहे. यासाठी एनसीसी, नुतन मराठा महाविद्यालय, ॲङ बाहेती महाविद्यालय, विद्या इंग्लीश स्कूल, मूळजी जेठा महाविद्यालय हे पाच पथक दहीहंडी फोडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहेत. विवेकानंद व्यायाम शाळेतर्फे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. यासह शिवतांडव व शैर्यवीर या दोन्ही ढोलताशा पथकातील सुमारे २७५ ढोलताशा वादक आपल्या कलेची प्रस्तुती देणार आहेत. मल्लखांब प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २० विद्यार्थी रोप मल्लखांब, पोल मल्लखांब चे चित्तथरारक सादरीकरण करणार आहेत. अनुभूती शाळा, जी.एच. रायसोनी पब्लीक स्कुल, रूस्तमजी इंटरनॅशनल, किडस् गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल, इपिक डान्स स्टुडिओ तर्फे सांस्कृतिक नृत्य प्रस्तुत केले जाणार आहे. ५ ते १२ वर्ष वयोगटातील बाळगोपाळांसाठी राधा-श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. 

कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक मेघनाथन राजकुमार, भुसावळ रेल्वे मंडळाचे मंडळ रेल प्रबंधक इति पांडे, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील, एनसीसीचे कमांडींग ऑफिसर कर्नल अभिजित महाजन, लेफ्टनंट कर्नल पवन कुमार, वाहतुक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, जयपाल हिरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी दहीहंडी उत्सवाच्या अध्यक्षा संस्कृती नेवे, उपाध्यक्षा मेघना भोळे, यामिनी कुळकर्णी, सचिव पियुष तिवारी, सहसचिव हर्षल मुंडे, खजिनदार अर्जुन भारूळे, सागर सोनवणे, शुभम पुश्चा, प्रितम शिंदे, तृषांत तिवारी, पियुष हसवाल, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, पियुष तिवारी, यश राठोड, यांच्यासह आदि सदस्य परिश्रम घेत आहे. तरूणींच्या दहीहंडी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दहीहंडी फोडण्याला केवळ तरूणींच्या पथकाला मान दिला जात असल्याने मनोरे रचण्याच्या सरावाला वेग आला आहे. शहरातून एकूण पाच तरूणींचे गोविंदा पथक सहभागी होणार आहेत. दरवर्षी हा उत्सव पाहण्यासाठी १० ते १२ हजार जळगावकर नागरिक सहकुटुंब उपस्थित असतात. यंददेखील गर्दी मोठ्या प्रमाणात होईल व त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले असल्याचे कार्याध्यक्ष प्रितम शिंदे यांनी सांगीतले. सुरक्षेच्या दृष्टीने जमिनीवर मॅट अंथरतात-दहीहंडी सारख्या मोठ्या उत्सवात पुरूषांप्रमाणे महिलांचाही सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन ने तरूणींचा दहीहंडी महोत्सव सुरू केला. हा जळगाव शहराचा कौटुंबिक कार्यक्रम असून, संस्कृती व परंपरा टिकविण्यासाठी सामुहिक प्रयत्न असतो. महिला गोविंदा पथकातील तरूणींच्या सुरक्षेच्या दृष्टीने खाली मॅटही टाकली जाते-विराज कावडीया, संस्थापक अध्यक्ष, युवाशक्ती फाऊंडेशन.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे