क्रिडा व मनोरंजनजळगाव

एकलव्य क्रीडा संकुल येथे दुसऱ्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन

जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित एकलव्य क्रीडा संकुल येथील एकलव्य टेबल टेनिस अॅकॅडमी मध्ये दुसऱ्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन दिनांक ०९ व १० सप्टेंबर २०२३ दरम्यान करण्यात आलेले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व टेबल टेनिस खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले आहे.

या स्पर्धा ११/१३/१५/१७ व १९ वर्षाखालील वयोगटात होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी शुक्रवार, दिनांक ०८ सप्टेंबर २०२३, सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत एकलव्य टेबल टेनिस अॅकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्री. विजय विसपुते यांच्याकडे नाव नोंदणी करावी.

खेळाडुनी सोबत येतांना खालील कागदपत्रांचे ०२ सेट सोबत आणावे :

(१) जन्म दाखला (झेरॉक्स प्रत) 

(२) आधार कार्ड (झेरॉक्स प्रत) 

(३) बोनोफाईड सर्टिफीकेट 

अधिक माहिती करिता श्री. विजय विसपुते (मो. न. ९८५०६७५०५१) यांच्याशी संपर्क करावा

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे