न्यू एरा एज्युकेशन सोसायटी संचलित रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
दि. 05 मंगळवार रोजी पुस्तकांच्या दुनियेची सफर करत आज *शिक्षक दिन* साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरिता शिक्षक दिनानिमित्त भावार्थ व्हॅन ,भावार्थ पुणे यांच्या चालत्या फिरत्या ग्रंथालय यांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पुस्तकांच्या सानिध्यात वेळ देऊन त्यांच्या वाचनाची संधी या शिक्षक दिनाच्या निमित्ताने देण्यात आली. शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी शिक्षकांनी आज विविध विषय शिकवून शिक्षक बनण्याची जबाबदारी सांभाळून संपूर्ण शाळेत शिस्त राखली.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त भाषणे देणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना *भावार्थ टीमने* नावाजलेली पुस्तके बक्षीस देऊन गौरविले.
विद्यार्थ्यांनी आपला वेळ जास्तीत जास्त पुस्तकांच्या सानिध्यात घालवावा यासाठी शाळेचे ग्रंथालय खुले करून दिले.अधिकाधिक वाचनाची आवड जोपासण्यासाठी शाळेच्या अध्यक्षा महोदय सौ. रोजमीन खिमानी प्रधान मॅडम यांनी अमेरिकेतून पुस्तके पाठवीली . त्यांचा ग्रंथालयात समावेश करण्यात आला .