जळगाव

महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तट रक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (वृत्तसेवा) -भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या सागरी भागातील सुरक्षा उपाययोजनांसाठी महाराष्ट्र शासनाकडून भारतीय तटरक्षक दलाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यानी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्राचे कमांडर तथा महासंचालक अनुराग कौशिक, निवृत्त कमांडर मिलिंद पाटील आदी उपस्थित होते. 

या भेटीत श्री. बाडकर यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना महाराष्ट्रातील सागरी भागातील सुरक्षा उपाययोजनांची माहिती दिली. तटरक्षक दलाच्या रत्नागिरी येथील हवाई सुरक्षा सुविधांचा आढावा सादर केला. विशेषतः वरळी येथील सुविधांचे तात्काळ अद्ययावतीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वरळीसह, राज्यातील सागरी परिक्षेत्रात तट रक्षक दलासाठी आवश्यक अशा सोयी-सुविधा उभारणी करिता महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे