जळगाव

२५ हजाराची लाच घेतांना वायरमन एसीबीच्या जाळ्यात..

जळगाव – येथील महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) यास २५ हजाराची लाच घेतांना जळगाव एसीबी च्या पथकाने रंगेहाथ पकडले. असुन संतोष भागवत प्रजापती वरिष्ठ तंत्रज्ञ(वायरमन) आदर्श नगर कक्ष म.रा.वि.वि .कंपनी जळगांव असे त्याचे नाव व पद असुन या कारवाईने लाचखोरांच्या गोठ्यात मोठी खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार यांचे आईचे नावाने घराचे जुने विज मिटर असुन यातील संतोष भागवत प्रजापती वरिष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) यांनी विज मिटर हे जुने असून नादुस्त आहे तुम्हाला नविन मिटर बसावावे लागेल त्यासाठी मला 25000 हजार रुपये द्यावे लागतील असे तक्रारदार यास सांगितले त्यांनतर संतोष भागवत प्रजापती  यांनी पंचासमक्ष 25000 रुपयांची लाचेची मागणी करून  संतोष भागवत प्रजापती यांनी पंचा समक्ष 25000/ रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांचे वर रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई –

सुहास देशमुख,पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. एन.एन. जाधव पोलिस निरीक्षक, अमोल वालझाडे पोलीस निरीक्षक  स.फौ. दिनेशसिंग पाटील स.फौ.सुरेश पाटील,  पो.ना. बाळू मराठे पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. राकेश दुसाणे, पो.कॉ अमोल सुर्यवंशी, पो. कॉ.प्रणेश ठाकुर

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे