जळगाव जिल्हा

जिल्हाधिकारी कार्यालयात विशाखा समिती फलकाचे अनावरण….

जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी १५ नोव्हेंबरपर्यंत महिला तक्रार निवारण समिती स्थापन कराव्यात, समित्यांचे बोर्ड दर्शनी भागात लावण्यात यावेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना

जळगाव –कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैगिक छळ रोखण्यासाठी महिला तक्रार निवारण समित्या (विशाखा समिती) जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी १५ नोव्हेंबरपर्यंत स्थापन कराव्यात. समित्यांचे बोर्ड (फलक) कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत दिल्या.कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ कायदा २०१३ (प्रतिबंध, मनाई व निवारण) हा कायद्यांबाबत महिला तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुख, शिक्षण संस्था प्रमुख, खासगी आस्थापना प्रमुख यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वनिता सोनगत उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  म्हणाले की, विशाखा समित्या स्थापन करणे सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे व खाजगी आस्थापना, शाळा, महाविदयालय, महामंडळ, कंपनी, कोचिंग क्लासेस यांना बंधनकारक आहे. ज्या कार्यालयांमध्ये ही समिती स्थापन झालेली नाही त्यांनी १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत समित्या स्थापन करून गुगल लिंकद्वारे अहवाल सादर करावा. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ कायदा २०१३ (प्रतिबंध, मनाई व निवारण) हा कायदा पारित करण्यात आलेला आहे. तसेच सदर कायद्यानुसार प्रत्येक प्रत्येक शासकीय, निमशासकीय महामंडळे व खाजगी आस्थापना, शाळा, महाविदयालय, महामंडळ, कंपनी, कोचिंग क्लासेस यांच्या आस्थापनांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक कर्मचारी आस्थापनेवर असल्यास आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठित करणेबाबत कायद्यात तरतुद करण्यात आली आहे. तसेच जी कार्यालये / आस्थापना यांचेकडून अंतर्गत तक्रार समिती गठित करण्यात आली नसेल अशी कार्यालये / आस्थापना प्रमुखांवर रक्कम रु.५०,०००/- दंड वसुलीची कार्यवाही करणेबाबत संदर्भिय कायद्याचे कलम २६ (१) यामध्ये नमुद करण्यात आलेले आहे. सदर कायदयांन्वये समिती स्थापन केल्याबाबतचा अहवाल दरवर्षी शासनास सादर करावा लागतो. परंतू बऱ्याच कार्यालयानमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठित केलेल्या नाहीत. त्यानुषंगाने जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून https://forms.gle/XtQb3eoFmRA3ENny5 गुगल लिंक तयार करण्यात आलेली असून या गुगल लिंकवर कार्यालयाने माहिती भरावी तसेच सदरची गुगल लिंक आपले अधिनस्त असलेल्या व आपले स्तरावरून मान्यता दिलेल्या शासकीय, निमशासकीय, महामंडळे, खाजगी आस्थापना/ कंपनी उद्योग/व्यायसायीका शाळा/ महाविदयालय कोचिंग क्लासेस इत्यादी सर्व कार्यालयामध्ये पाठविण्यात यावी. व त्यांना गुगल लिंकवर माहिती भरण्याबाबत कळविण्यात यावे.ज्या कार्यालय प्रमुखांकडून अंतर्गत तक्रार समिती गठित करण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली नसेल त्यांना कायद्याचे कलम २६ (१) नुसार ५० हजार रूपयांचा दंड आकारण्याच्या कार्यवाहीस सामोरे जावे लागेल. तसेच ज्या आस्थापना प्रमुखांच्या अधिनस्त कार्यालयांनी गुगल लिंक भलेलेली नसेल त्या आस्थापना प्रमुखांना प्रत्यक्ष भेटून खुलासा सादर करावा लागेल. ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवरिल कर्मचारी यांची संख्या १० पेक्षा कमी असेल त्यांनीही गुगुल लिंक भरावी. व १० पेक्षा कमी कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र गुगल फॉमच्या शेवटच्या मुददयामध्ये अपलोड करण्यात यावेत, ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर कर्मचारी यांची संख्या १० किंवा १० पेक्षा अधिक असेल त्यांनी समिती गठीत केल्याच्या आदेशाची प्रत सदरच्या मुददयामध्ये अपलोड करावी. अशा सूचना ही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात विशाखा समिती फलकाचे अनावरण

जिल्हाधिकारी कार्यालयात यापूर्वीच विशाखा समिती गठीत होती. मात्र याबाबतचा बोर्ड दर्शनी भागात प्रदर्शित होईल असा नव्हता. ही बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी आजच तात्काळ बोर्ड लावण्याचा प्रशासनाला सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समिती सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या फलकाचे आज अनावरण करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे