जळगाव

नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा आरोग्य अभियान..

इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शासकीय होमिओपॅथी व आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवदुर्गा आरोग्य अभियान

जळगाव – जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनानुसार इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शासकीय होमिओपॅथी व आयुर्वेद महाविद्यालय व जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत तरुण कुढापा चौक, जुने जळगाव या ठिकाणी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य अभियानात नागरिकांची हिमोग्लोबिन तपासणी, ब्लड प्रेशर, डोळ्यांची तपासणी आणि शुगर तपासणी करण्यात आली. आज दिवसभरात 143 नागरिकांची तपासणी करण्यात आली. पुढील तीन दिवसात वाल्मिक नगर, शिवाजी नगर तसेच मिल्लत नगर परिसरात हे अभियान राबविले जाणार आहे.

या अभियानासाठी शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रूग्णालय जळगांवचे डॉ. रितेश पाटील,डॉ केयुर चौधरी, डॉ. सतीष पाटील डॉ. मिताली पाटील, डॉ मनोज विसपुते, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाचे डॉ. सुसे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डोळे तपासणी विभागातील डॉक्टर्स, रेडक्रॉसचे पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे