मालवाहू रिक्षा चालकास मारहाण करत लुटणाऱ्या दोघांना MIDC पोलीसांनी केली अटक..
जळगाव (प्रतिनिधी) :- एमआयडीसी परिसरातील सुप्रीम कंपनीत माल पोचविण्यासाठी जात असलेल्या मालवाहू रिक्षाचालकाला मारहाण करत लूट केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा प्रकरणी पोलिसांनी दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
गोपाळ एकनाथ शिदे रा. मुसळी ता धरणगाव जि जळगाव हे त्यांचे मालवाहु रिक्षाने सुप्रिम कंपनी एमआयडीसी जळगाव येथे माल पोहचविण्यासाठी कंपनीच्या गेटसमोर असतांना काळ्या रंगाचे प्लेंडर मोटारसायकल आलेल्या दोन अनोळखी ईसमांनी मारहाण करुन पँटच्या खिशातुन 3500/- रुपये बळजबरीने काढुन घेतले होते म्हणुन सदर बाबतीत गोपाळ शिदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात दोन ईसमाविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासामध्ये पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश भिमराव सपकाळे रा. रामेश्वर कॉलनी जळगाव व त्याचा साथीदार गोपाळ रविद्र पाटील रा. आदित्य चौक, रामेश्वर कॉलनी जळगाव याच्या मदतीने केला आहे बाबतची माहिती मिळाल्यांने त्यांना ताब्यात घेण्यात आले होते त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन त्यांना न्यायमुर्ती सुवर्णा कुलकर्णी याच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना 05 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. सदरची कारवाई ही पोलीस निरिक्षक जयपाल हिरे, पोउनि निलेश गोसावी, पोउनि दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, योगेश बारी, सचिन पाटील, किशोर पाटील, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे अशांनी केली असुन राकेश सपकाळे याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे.