जिल्ह्यातील प्रचार तोफा थंडावल्या :आता लक्ष मतदानाच्या दिवसाकडे..
जळगाव – जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रामधील पक्षाच्या व पक्ष उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा १८ रोजी सायंकाळी शांत झाल्या यानंतर सर्वांचे लक्ष हे मतदानाच्या दिवसाकडे लागलेल्या असून मतदानाच्या दिवसासाठी तयारीला उमेदवार व कार्यकर्ते लागलेले दिसून येत आहे
जळगाव जिल्ह्यातील चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर,एरंडोल, चाळीसगाव,पाचोरा,जामनेर, मुक्ताईनगर, या मतदारसंघातील सर्व उमेदवारांच्या १८ रोजी सायंकाळी प्रचार सभा व तोफा थंडावलेल्या आहेत काही क्षण विश्रांती घेत कार्यकर्ते २० तारखेच्या मतदानाच्या दिवशी याद्या व बूथ कार्यकर्ते यांच्या जुळवाजुळीमध्ये लागलेले आहेत राष्ट्रीय व राज्य पक्षाचे कार्यकर्त्यांच्या याद्या व कार्यकर्ते आधीच ठरलेले असल्याने २० तारखेचे नियोजन आखण्याचे काम सुरू झालेले आहेत गावातून मतदान केंद्रापर्यंत वार्डातील प्रत्येक मतदान बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर जबाबदारी नियुक्त करण्यात येत आहे
जळगाव जिल्ह्यातील सर्वात जास्त मतदान हे जळगाव शहर चार लाख 21 हजार 313 आहे, यानंतर चाळीसगाव शहर तीन लाख 69 हजार 926 जामनेर तीन लाख 28 हजार 997 चोपडा तीन लाख 26 हजार 282 रावेर 35 हजार 484 भुसावळ तीन लाख 11 हजार 871 जळगाव ग्रामीण तीन लाख 31 हजार 968 अंमळनेर तीन लाख 4 हजार 226, एरंडोल दोन लाख 89 हजार 724 पाचोरा 3लाख 25 हजार,837, मुक्ताईनगर 3लाख 245 असे एकूण जळगाव जिल्ह्याचे 3616403 असे मतदान आहे
ईतर महत्वाच्या बातम्या
अवैध गावठी दारुभट्ट्यांवर चोपडा वनपरिक्षेत्रात वनविभागाची धडक कारवाई..