जळगाव

बहुभाषिक ब्राह्मण महिला संघातर्फे मोफत रक्त – नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन..

जळगाव (प्रतिनिधी) : शहराच्या सामाजिक क्षेत्रात सातत्याने समाजपयोगी नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या बहुभाषिक ब्राह्मण महिला संघातर्फे आज (दि.२२) सकाळी सात ते अकरा या वेळात काव्य रत्नावली चौक येथे मोफत रक्त तपासणी, नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोफत रक्त तपासणी, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरासाठी रेडक्रॉस जळगावचे अनमोल सहकार्य लाभले आहे. हे शिबिर समाजातील सर्व घटकांसाठी असल्याने, शहरवासियांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाच्या अध्यक्षा वृंदा भालेराव, पदाधिकारी व कार्यकारिणीतर्फे करण्यात आलेले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे