जळगावात दोन गटात तुफान हाणामारी : एकाचा मृत्यू..
जळगाव : शहरातील राज मालती नगरमध्ये आपापसातील जुन्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि. 20) रोजी सकाळी घडली आहे. यामध्ये सिद्धार्थ माणिक वानखेडे याचा मृत्यू झाला आहे.
या संदर्भातील अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील राज मालतीनगर परिसरामध्ये जुन्या वादातून दोन गटात तूफान हाणामारी झाली.यामध्ये सिद्धार्थ माणिक वानखेडे (वय – ३६ ल, रा. राजमालती नगर) याच्या छातीवर आठ ते दहा जणांनी बेदम लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तर विशाल अजय सुरवाडे (वय-२८), जानू संजू पाटील (वय-२०), फैजन राजू पाटील (वय-२४) आणि मेहमूद हाजी बिस्मिल्ला पटेल (वय-४२ सर्व रा. राजमालती नगर) हे सर्व जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील ७ ते ८ जणांना शहर पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.