गुन्हेगारीजळगावब्रेकिंग

जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार..

जळगाव – शहरातील शेरा चौक परिसरात राहणाऱ्या अपक्ष उमेदवाराच्या घरावर दोन दुचाकींवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी  गोळीबार केल्याची घटना १८ रोजी पहाटे ४ वाजता उघडकीला आली. जिल्ह्यातील निवडणुकीत दुसऱ्यांदा अपक्ष उमेदवाराच्या वार गोळीबार झाल्याची घटना घडली यापूर्वी मुक्ताईनगर मध्येही घटना घडली होती.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शेरा चौकात राहणारे एमआयएमचे ते माजी जिल्हाध्यक्ष अहमद हुसेन शेख (वय ५०) हे जळगाव शहर विधानसभा निवडणूकीसाठी अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात l आहे. १८ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास शेरा चौकातील नागरिक झोपेत असताना दोन दुचाकींवर आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार करण्यात आला. यामुळे घरावरील खिडकीचा काच फुटला. ही घटना घडल्यानंतर कुटुंबिय जागे झाले आणि एमआयडीसी पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आले.

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून या अनुषंगाने पुढील तपासाला सुरूवात करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे