चाळीसगाव

चाळीसगाव शेतकी संघ निवडणूक अखेर बिनविरोध…

६ जागा मिळवत शेतकी संघात भाजपाची मोठी मुसंडी.  

चाळीसगाव – शेतकरी सहकारी संघ पंचवार्षिक निवडणूक आज दि.२० रोजी उमेदवारी अर्ज माघारीच्या आज शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडून अखेर निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. त्यात भाजपचे ६ तर राष्ट्रवादी सुळे गटाचे ९ संचालक शेतकी संघावर बिनविरोध निवडले गेले आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने शेतकी संघाच्या इतिहासात प्रथमच मोठी मुसंडी मारली आहे. बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयात करण्यात आला. यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर पाटील जळकेकर, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, संजयतात्या पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम. शहराध्यक्ष नितीन पाटील, विधानसभा निवडणूक प्रमुख घृष्णेश्वर पाटील, कृउबा सभापती कपिल पाटील, विवेक चौधरी, विजय पाटील, उदेसिंग मोहन पाटील आदी उपस्थित होते.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपच्या बिनविरोध बोलणीत राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व १५ जागांवर आपले संचालक बिनविरोध करून घेतले होते. त्यावेळी बेसावध असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना ऐनवेळी निवडणुकीत माघार घेण्याची वेळ आली होती. मात्र आता कुठेही गाफील न राहता राष्ट्रवादी प्रणीत शहर विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत देशमुख व कॉंग्रेसतर्फे माजी आमदार ईश्वर जाधव यांना सोबत घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी मोठ्या कौशल्याने बिनविरोधचे गणित सोपे केले व २०१६ मध्ये राष्ट्रवादी कडून झालेल्या दगाफटक्याचा वचपा काढला. ६ संचालक भाजपचे असल्याने शेतकी संघाच्या कारभारावर देखील त्यांचे लक्ष राहणार आहे.

गेल्या २२ वर्षांपासून राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असणाऱ्या चाळीसगाव शेतकी संघामध्ये आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनलची मोट बांधली गेली होती. त्यामुळे प्रथमच आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकी संघ निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठे आव्हान निर्माण केल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र होते. मात्र शेतकी संघाची सध्याची अवस्था व शेतकरी हित डोळ्यापुढे ठेवत दोन्ही पक्षांच्या वतीने सामोपचाराने सदर निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षाचे बिनविरोध संचालक खालीलप्रमाणे..!

सर्वसाधारण मतदारसंघ १) प्रशांत रामराव देशमुख (चाळीसगाव)२) अविनाश जगन्नाथ चौधरी (खेडगाव) ३) किशोर माधवराव पाटील (तमगव्हाण) ४) विजय झामसिंग जाधव (घोडेगाव)अनुसूचित जाती/जमाती ५) ईश्वर रामचंद्र जाधव (चाळीसगाव)महिला राखीव ६) मेघा प्रशांत पाटील (उंबरखेड )

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे