जळगाव जिल्ह्यात ९५००० क्विंटल ज्वारी खरीदीचे उदिष्ट वाढविले..
महाराष्ट्र राज्य पणन महासंघ उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती
जळगाव, (प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील ज्वारी पेरणी केलेल्या व ज्वारीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून जिल्ह्यात लवकरच ज्वारी खरेदीसाठी १८ केंद्रसुरु करण्यात येणार असुन ज्वारी खरेदिसाठी जिल्हयाकरीता एकूण ९५००० कि. उदिष्ट प्राप्त झाले होते. त्यास आता मुदत वाढ मिळाली आहे त्यामुळं जिल्हातील शेतकऱ्यांची ज्वारी खरेदीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पणन महासंघल उपाध्यक्ष रोहित निकम यांनी आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली
जिल्ह्यात एकुण ५३२७ शेतकऱ्यानी नोंदनी केलेली आहे दिनांक ३१/७/२०२४ अखेर २४१५ शेतकऱ्याकडुन ८४११२ कि. ज्वारी खरेदि झालेली आहे. ज्वारी खरेदिसाठी जिल्हयाकरीता एकूण ९५००० कि. उदिस्ट प्राप्त झाले होते. व त्याची मुदत ३१ जुलै होती. दरम्यान मंत्री गिरीष महाजन (ग्राम विकास मंत्री), गुलाबराव पाटील (पाालक मंत्री), मंत्री आनिल पाटील (अपती व्यवस्थपण मंत्री) यांच्या पाठपुराव्यामुळं व राज्य शासन व केंद्र शासन यांच्या कडील पाठपुरावा मुळेच जिल्हास वाढीव उदिस्ट (९५००० कि.) मिळाले व खरेदिस जि मुदत संपली होती त्यास विशेष परवांगी केंद्र शासना कडुन काल (दिनांक ३१/८/२०२४) पर्यत प्राप्त झाले आहे. दरम्यान याकामी आ. मंगेश चव्हाण, आ. संजय सावकारे तसेच संजय पवार यांचे देखील सहकार्य लाभले असल्याचे रोहित निकम म्हणाले.