५ हजाराची लाच भोवली : गोदाम व्यवस्थापकासह खाजगी पंटर ACB च्या जाळ्यात..
एरंडोल – येथील शासकीय गोदाम व्यवस्थापक नंदकिशोर रघुनाथ वाघ आणि खाजगी पंटर हमजेखान मेहमूदखान पठाण यांना ५ हजार लाच प्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
यातील तक्रारदार यांना शासकीय गोदाम मधून बारदान (रिकाम्या गोण्या) विकत घेण्याचे कंत्राट जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडून मिळाले आहे. नंदकिशोर रघुनाथ वाघ हे शासकीय धान्य गोदाम, एरंडोल चे गोडावून कीपर आहेत व हमजेखान महेमुदखान पठाण हे कंत्राटदार मुकादम आहेत. तक्रारदार यांनी त्यांना कंत्राट प्रमाणे नेमून दिलेले बारदान गोडावून मधून उचल्यानंतर आलोसे नंदकिशोर रघुनाथ वाघ,गोदाम व्यवस्थापक व हमजेखान महेमुदखान पठाण , मुकादम, यांनी ७०० अतिरिक्त बारदान त्यांना इच्छा नसताना दिले व त्या बदल्यात ७००० ची मागणी केली. असे न केल्यास तुझा कंत्राट रद्द करू व भविष्यात कंत्राट मिळू देणार नाहीत असं सांगितले. म्हणून तक्रारदार यांनी समक्ष तक्रार दिली.
पडताळणी कारवाई दरम्यान दोन्ही आरोपीनी अतिरिक्त दिलेल्या बारदान च्या मोबदल्यात प्रथम ७०००, ६०००, ५५०० ची मागणी करून तडजोड अंती ५००० रुपयाची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. आज दिनांक १३/११/२०२४ रोजी यातील हमजेखान महेमुदखान पठाण , मुकादम यास ५००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रांगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेवर एरंडोल पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे,पोउनि दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोकॉ राकेश दुसाने यांनी केली