यावल

ओव्हरटेक करतांना कार चालकाने घेतला मोटर सायकल वर स्वार आलिशान तडवींचा बळी…

 

यावल  ( सुरेश पाटील)

बऱ्हाणपूर अंकलेशवर महामार्गवरील यावल फाॅरेस्ट नाक्याजवळ कार मोटर सायकल अपघात होउन जखमी यांना ग्रामीण रुग्णालयात यावल येथे दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने भुसावळ येथील विघ्नहर्ता हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले जखमीवर औषधोपचार चालू असतांना रसुल रहिमान तडवी यांचा पोलिसांनी नोंदवीलेल्या जबाबाहुन ३ नोव्हेंबर २०२५ रोजी गुंन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान औषधोपचार घेत असतांना सदर अपघातातील गंभीर जखमी साक्षीदार नामे अलिशान रहेमान तडवी या दि४ नोव्हेंबर रोजी रात्री ४ वाजता मयत झाली आहे .यावल पोलीस स्टेशनला मोटर सायकलवर कार अपघाता संदर्भात गु.र.न. 415/2025 भारतीय न्याय संहिता कलम 281,125 (A), 125 (B), प्रमाणे सह मोटर वाहन अधिनियम कलम 184 प्रमाणे फिर्यादी रसुल रहिमान तडवी वय-40 वर्ष व्यवसाय-शेती रा- कासारखेड़ा ता-यावल यांच्या फिर्यादीवरून राखाडी रंगाची कार क्र MP09WL3915 वरील चालक नाव गाव माहीत नाही वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित जखमी 1) फिर्यादी स्वत: , (2) सलिमा रहिमान तडवी जखमी, वर्ष 37, रा-कासारखेड़ा ता-यावल जि-जळगांव यांच्या वर औषधोपचार चालू असून

अपघातग्रस्त वाहने टि.व्ही. एस रेडान कंपणीची मोटार सायकल क्र MH19 DY 9047, व राखाडी रंगाची कार क्र MP09WL3915 हि आहेत याबाबत अधिक माहिती अशी कि फिर्याद नामे रसुल रहिमान तडवी हा त्याची आई व लहान बहिण सोबत की, दिनांक 02/11/2025 रोजी सकाळी 10.45 वाजता कासारखेडा हुन भुसावळ येथे नातेवाईक यांचे कडे लग्नात जात असतांना यावल चोपडा रोडवर यावल शहराबाहेर फॉरेस्ट नाक्याचे जवळ रोडवर राखाडी रंगाची कार क्र MP09WL3915 वरील चालक नाव गाव माहीत नाही. याने त्याच्या ताब्यातील कार ही भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने चालवून फिर्यादी व साक्षीदार यांचे मोटर सायकल ला भरधाव वेगात येउन ओव्हरटेक करीत असतांना सदर कारचे किनर साईडेचे मागिल चाकाचे गेट जवळील हॅन्डलचा कट लागल्याने अपघात होवुन फिर्याद साक्षीदार हे मोटर सायकल वरुन फेकले जाउन गंभीर दुखापत होवुन जखमी झाले आहेत, मजकुराचे फिर्यादवरुन वर प्रमाणे गुन्हा रजि. दाखल केला असुन पोलीस निरीक्षक सो यांचे मार्गदर्शना खाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा.फौज विजय पाचपोळे , पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पवार, पोलिस अंमलदार मोहन तायडे हे करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे