घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प म्हणजे कचरा पेटवून देणे ?
प्रशासक आणि मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष परंतु ठेकेदाराला पेमेंट वेळेवर.

यावल दि.२९ ( सुरेश पाटील ) – नगरपरिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ठेकेदाराच्या सोयीनुसार आणि मर्जीनुसार राबविण्यात येत असून शहरातील ओला व सुका कचरा संकलन करण्याचे काम सुद्धा ठेकेदार हा आपल्या यंत्रणेमार्फत अनियमित करीत असल्याने तसेच घनकचरा प्रकल्पात संकलन केलेल्या कचऱ्याचे विलगीकरण न करता संकलन केलेला कचरा पेटवून दिला जात असल्याने, यावल शहराचे प्रदूषण दूषित होत आहे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.याकडे मात्र नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी,मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष होत असून माऊली आपली माया दाखवून दर महिन्याला ठेकेदाराचे पेमेंट वेळेवर काढून घेत असल्याची चर्चा आहे.
घनकचरा गोळा करणे,त्याची वाहतूक करणे, त्याचे विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणे यांसारख्या कामांचा समावेश असलेली एक पद्धतशीर प्रक्रिया आहे.या प्रकल्पांचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे संरक्षण करणे आहे. परंतु ठेकेदार अशी प्रक्रिया न राबविता प्रकल्पाच्या ठिकाणी घनकचरा पेटवून देत असल्याने पर्यावरण दूषित होत आहे.
घनकचरा प्रकल्पाचा उद्देश सार्वजनिक आरोग्य सुधारणे आणि कचरा कमी करणे आहे.यासाठी कचरा कमी करणे,पुनर्वापर करणे, पुनर्प्राप्ती (reuse and recycle) करणे यासारख्या ‘3R’ (किंवा 4R) नियमांचा वापर केला जातो.
प्रकल्पाचे मुख्य घटक
कचरा संकलन आणि वाहतूक घरोघरी कचरा गोळा करणे आणि घनकचरा प्रक्रिया केंद्रांपर्यंत त्याची वाहतूक करणे.कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू वेगळे काढणे, खतनिर्मिती करणे किंवा ऊर्जा निर्मिती करणे.विल्हेवाट पुनर्वापर शक्य नसलेल्या कचऱ्याची सुरक्षित आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे.जागरूकता लोकांना कचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापनाच्या योग्य पद्धतींबद्दल शिक्षित करणे. असे ठेकेदार प्रत्यक्षात करीत आहे का..? आणि याची खात्री मुख्याधिकारी किंवा संबंधित अधिकारी करीत आहेत का.?यावल शहरात प्रत्येक घरातून कचरा संकलन करताना प्रत्येक घराचे स्कॅनिंग कोण करीत आहे.? स्कॅनिंग करण्याचे काम वाहन चालकाला कोणत्या नियमानुसार देण्यात आले..? घनकचरा प्रकल्प राबविताना मजुरांना ठेकेदार किती पेमेंट देतो..? घनकचरा प्रकल्पात आवश्यक ती मशिनरी सुरू आहे की बंद आहे. याची चौकशी कोण करणार.? घनकचऱ्याचे विलगीकरण न करता घनकचरा पेटवून दिला जातो याबाबत नगरपालिकेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपले लक्ष केंद्रित करून ठेकेदाराला दिले जाणाऱ्या पेमेंटला / देयकाला स्थगिती द्यावी अन्यथा पुढील कार्यवाहीस ठेकेदारासह संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी अशी यावल शहरात चर्चा आहे.