वनकोठे गावाजवळ 19 किलो गांज्या जप्त : कासोदा पोलिसांची कारवाई..

कासोदा – कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत व परीसरात गांजा विक्री होत असलेबाबत गुप्त बातमीदारामार्फत कासोदा पोलिसांना माहीती मिळाली होती त्यानुसार पोस्टे हद्दीत वेशांतर करुन मागील ५ दिवसांपासुन सपोनि. निलेश राजपुत व त्यांच्या पथकाने गांजा पकडण्यासाठी सापळा रचला होता. सुरवातीचे ४ दिवस अपयश मिळाले होते. परंतु दि.२५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान वनकोठे गावाजवळ सपोनि. निलेश राजपुत पोउनि, दत्तु खुळे, पोहेकों/ नंदलाल परदेशी, पोकों/ समाधान तोंडे, पोकॉ/ लहु हटकर यांना एरंडोल कडुन कासोदा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वनकोठे गावाजवळ एक संशयित इसम त्याचे मोटार सायकलवर प्लास्टीकचे गोणीत गांजा घेवुन जात असल्याची माहीती मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचुन पाठलाग करुन पकडले. त्याचे मोटारसायकल वरील गोणी चेक केली असता त्यात खाकी रंगाचे पॅकिंग मिळून आले ते फोडुन चेक केले असता त्यामध्ये गांजा मिळुन आले.
सदर पथकाने संशयीत इसम नामे अजय रविंद्र पवार वय २७ रा. सोनबर्डी ता. एरंडोल याला ताब्यात घेवुन त्याचेकडुन १९ किलो गांजा व मोटारसायकल असा एकुण २,८०,००० रुपये किमंती चा मुद्देमाल जप्त केला. पोहेकों/ नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीनुसार गांजाची वाहतुक करणाऱ्या इसमाविरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे (एनडीपीएस) अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या सुचनां प्रमाणे सपोनि.निलेश राजपुत पोउनि.दत्तु खुळे, पोहेकों/नंदलाल परदेशी, पोना/अकील मुजावर, पोना/किरण गाडीलोहार, पोना/ नरेद्र गजरे, पोकों/समाधान तोंडे, पोकों/लहु हटकर अशांनी कारवाई केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. निलेश राजपुत हे करीत आहेत.