क्रिडा व मनोरंजनजळगाव

मोठ्या जल्लोषात शिंपी प्रीमियर लीग टू चे उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी)-श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित शहर युवक मंडळ जळगाव आयोजित SPL 2 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चे 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान जळगाव येथील शिवतीर्थ मैदान जीएस ग्राउंड येथे सुरू झाले असून गुरुवार रोजी मोठ्या जल्लोषात उद्घाटन सामन्याने सुरुवात झाली सकाळी 10 वाजता शहराचे लोकप्रिय आ सुरेश भोळे राजू मामा यांनी संत नामदेव व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले व श्रीफळ अर्पण करून उद्घाटन केले.

या प्रसंगी राजू मामांनी सांगितले की खेलो इंडिया माध्यमातून देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी सुरू केले असून त्या अनुषंगाने विविध समाजातील युवक एकत्र येऊन खेळातून आपले कौशल्य दाखवत आहेत खेळ माध्यमातून समाज संघटन व समाज जोडण्याचे कार्य शिंपी समाज युवक मंडळाने हाती घेतलेले ही अभिमानाची गोष्ट असून युवक संघटनेने केलेले कार्य हे फार मोलाचे असून आगामी काळात युवकांचे चांगली फळी निर्माण होईल व नवयुकाना समाज कार्याची आवळ निर्माण होईल हितवर्धक संस्थेला 75 वर्षात पुर्ण झाले असून संस्थेने मागच्या महिन्यात भव्य अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते आगामी काळात युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाजातील सुशिक्षित बेरोजगार व शिवनकाम करणाऱ्या संघटित कारागीर वर्ग साठी कार्य करावे असे त्यांनी या प्रसंगी सांगितले व युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी यांनी लवकरच समाजातील सुशिक्षित बेरोजगार व शिवणकाम कारागिरी बांधव साठी कार्य हाती घेण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष विवेक जगताप सचिव अनिल खैरनार SPL प्रमुख सुमित अहिराव युवक मंडळ सचिव हेमंत शिंपी संस्था पदाधिकारी दिपक जगताप मनोज भांडारकर चेतन खैरनार दिलीप सोनवणे व संदिप सोनवणे सुरेश सोनवणे राजेंद्र बाविस्कर मुकुंद मेटकर ,प्रवीण जगदाळे किरण ,गणेश शिपी हे उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यासाठी युवक मंडळाचे कार्यकर्ते निलेश चव्हाण जिग्नेश सोनवणे भूषण सोनवणे मयूर शिंपी चेतन नेरपगार अशोक सोनवणे चार्ली शिंपी विशाल देवरे सागर देवरे यासह असंख्य युवक मंडळाचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहे आज एकूण नऊ सामने घेण्यात आले असून बारा टीम यात सहभागी झाले असून एकूण 33 सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून 19 फेब्रुवारी रविवार रोजी शिवजयंतीच्या दिवशी दुपारी चार वाजता कार्यक्रमाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे