स्वामी फाऊंडेशन तर्फे गरजूंना ब्लँकेट व उबदार कपडे वाटप…
जळगांव(प्रतिनिधी) – जळगांव शहरातील रात्री उघड्यावर झोपणा-या तसेच निवारा नसणा-या गरजू व्यक्तींना स्वामी फाउंडेशन तर्फे जळगाव शहरातील जे बेघर गरजु व्यक्ती रस्त्यावर किंवा मार्केटमध्ये झोपतात त्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी यंदाही ब्लॅंकेट व उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री योगेश चौधरी, श्री.बाळासाहेब शिंपी, आणि इतर पदाधिका-यांचे अनमोल सहकार्य लाभले. स्वामी फाऊंडेशन तर्फे गरजूंना थंडीपासून बचाव व्हावा यांसाठीच आम्ही दरवर्षी स्वतः अशा गरजू व्यक्तीपर्यंत मदत म्हणून शाल, ब्लँकेट पोहचवण्याचे काम करत असतो. कारण त्यांना थंडीमध्ये ख-या अर्थाने उबदार कपड्यांची गरज असते.
स्वामी फाऊंडेशनच्या माध्यमातून जळगांव शहारात अनेक समाजहिताचे निस्वार्थ कार्य राबवले जाते. यासाठी स्वामी फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी सहभागी होत असतात. यंदा जळगांव शहरातील गणेश कॉलनीतील बजरंग बोगदा परिसरात गरजूंना स्वामी फाऊंडेशनच्या वतीने ब्लॅंकेट व उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे अनेक गरजुना त्याचा लाभ मिळाला.