गुन्हेगारीपारोळा

मुख्यमंत्र्यांच्या सभेतून ३० हजाराची रोकड लंपास !

पारोळा पोलिसात गुन्हा दाखल

पारोळा : प्रतिनिधी 

शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका महाविद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभा सुरु असतांना याठीकाणी चोरट्यांनी आलेल्या शेतकरीच्या हातावर तुरी देत हजारो रुपये चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. एका शेतकरी खिश्यातून हजारो रुपये लंपास झाल्याची घटना घडल्यानंतर पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी  कि, जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असल्याने पारोळा येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारोळा तालुक्यासह शहरातील अनेक नागरिक या सभेत उपस्थित झाले होते. यावेळी तुफान गर्दी पाहून चोरट्यांनी आलेल्या लोकांचे खिश्यातून चांगलीच लुट केल्याची घटना उघडकीस आली आहे. तालक्यातील देवगाव येथील रहिवासी सुनील युवराज पाटील (वय ३६) हे दि १६ रोजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेच्या ठिकाणी गेले असता त्यांच्या खिश्यातून चोरट्याने तब्बल ३० हजार रुपये चोरून नेल्याची घटना ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल असून पुढील तपास पोहेकॉ.नाना पवार हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे