जळगावजळगाव जिल्हा

जिल्ह्यात या दिवशी ‘ड्राय डे’ घोषित करा !

अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाधिकारी मित्तल यांना निवेदन

जळगाव : प्रतिनिधी 

जगभरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या धूम धडाक्यात साजरी होत असते. जळगाव जिल्ह्यातहि मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येत असते. या दिवशी जिल्हाभरात या दिवशी ड्राय डे घोषित घोषित करा. यासाठी हा दिवस ड्राय डे म्हणून जिल्ह्यात घोषित करावा अशा आशयाचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना अखिल भारतीय मराठा महासंघ जळगांव महानगर पदाधिकारीनी दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, १९ फेब्रुवारी २०२३ रोजी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असुन त्या दिवशी शिवजन्मोत्सव हा संपूर्ण राज्यभरच नव्हे अखंड हिंदुस्थानात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तरी ज्या प्रमाणे राज्यात- जिल्ह्यात राष्ट्रीय दिन, उत्सव रोजी कुठलाही गालबोट लागू नये या कारणास्तव ड्राय डे घोषित केला जातो त्याच प्रमाणे १९ फेब्रुवारी २०२३ वार रविवार रोजी शिवजन्मोत्सवानिमित्त संपूर्ण जिल्हाभरात ड्राय डे घोषित करावा ही विनंती. आपल्या महाराजांचे तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे खऱ्या अर्थाने संस्कृती जपण्यास व पुढील पिढीपर्यंत योग्यरीत्या विचारधारा पोहचविण्यासाठी प्रशासनाचा मोलाचा वाटा ठरेल. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना महानगराध्यक्ष पियुष पाटील यांच्या नेतृत्वात गणेश निंबाळकर, प्रसाद पाटील, अजिंक्य पवार, तन्मय पाटील, निलेश पाटील, नयन चव्हाण, दीप पाटील यांनी निवेदन दिली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे