गुन्हेगारीयावल

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत वडिलांना मारहाण !

यावल : प्रतिनिधी 

एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्यात आला. एवढेच नाही तर या तरुणाने पीडित मुलीच्या वडिलांना मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा एक तरुण पाठलाग करीत होता. दरम्यान, गुरुवारी शाळेतून घरी येत असताना त्याने मुलीस मोबाइल क्रमांक मागितला. मुलीने घरी येऊन हा प्रकार सांगितला. बसस्थानकासमोर हा तरुण दिसला. मुलीने लागलीच वडिलांना माहिती दिली. तेव्हा वडिलांनी तरुणास जाब विचारला असता त्याने पीडितेच्या वडिलांना मारहाण केली व त्याची दुचाकी सोडून पळून गेला होता. याप्रकरणी यावल पोलिसात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे