गुन्हेगारीयावल

शहरात 68 वर्षीय वृद्धास चौघांची मारहाण

यावल(प्रतिनिधी) : शहरातील देशमुखवाडा भागात असलेल्या विवरेवाले महाराज मंदिरात ढोलकी वाजवण्यास दिली नसल्या राग येवून एका 68 वर्षीय वृद्ध इसमाला चौघांनी मारहाण केली व त्यांना जबर दुखापत केली तेव्हा याप्रकरणी सदर वृद्ध इसमाने दिलेल्या फिर्यादीनुसार यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील देशमुख वाड्यात विवरेवाले महाराज मंदिर आहे या मंदिरात श्रावण शंकर भिल वय 68 हे होते तेव्हा तेथे इंदूबाईचा नातू (नाव माहीत नाही) व त्याच्या सोबत तीन जण असे चार जण आले व त्यांनी या वृद्धास मंदिरातील ढोलक वाजवण्यासाठी मागितले तेव्हा त्यांनी नकार दिला असता त्याचा राग घेऊन या चौघांनी त्यांना मारहाण केली व लोखंडी पाईप त्यांच्या डोक्यात मारून दुखापत केली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे