यावलराजकीय

नायगाव येथील सरपंचावर अविश्वास प्रस्ताव पारित.

दिलेला शब्द पाळला नाही म्हणून केले पदउतार

यावल (प्रतिनिधी) : सरपंच पद तीन जनामधे विभागून घ्यायचे ठरल्याचा शब्द न पाळल्याने तालुक्यातील नायगाव येथील महिला सरपंच यांचेवरील दाखल अविश्वास ठराव 13 पैकी 12 सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान करत प्रस्ताव पारीत झाला आहे. गुरुवारी तहसीलदार महेश पवार यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली .

नायगाव येथील सरपंच शरीफा तडवी यांच्याविरुद्ध उपसरपंच सह सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. तेव्हा या अविश्वास प्रस्तावावर गुरुवारी नायगाव ग्रामपंचायत मध्ये तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली या सभेमध्ये अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 13 पैकी 12 सदस्यांनी मतदान केले व अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. या सभेत उपसरपंच सोनल रामदास पाटील, सदस्य नरेंद्र पाटील, चेतन पाटील, अजय पाटील, उत्तमराव सपकाळे, महेंद्र तडवी, नूरजहान तडवी, वृषाली पाटील, ज्योती देशमुख, रमाबाई कोळी, आलिशान तडवी, राजू तडवी व शरीफा तडवी यांची उपस्थिती होती. सभेचे कामकाजात ग्रामसेवक विलास साळुंखे यांनी सहकार्य केले.

ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होते व पाच वर्षात तिघांना सरपंच पद विभागून देण्याचे ठरले होते मात्र दोन वर्ष होऊन देखील सरपंच शरीफा तडवी यांनी राजीनामा न दिल्याने त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आता उर्वरित तीन वर्षात आलिशान तडवी व नूरजहान तडवी यांना विभागून सरपंच पद दिले जाणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे